श्री समर्थ खंडोजी महाराज यांच्या १९७ व्या पुण्यतिथी निमित्ताने पिंपळनेर शहरात नामसप्ताह महोत्सव सुरू आहे.दरम्यान उद्या रविवारी महत्वाचा पालखी सोहळा व रात्रभर निघणारे वहन,सोंगे, यात्रा इत्यादी बाबींच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने पिंपळनेर शहरात रूट मार्च काढण्यात आला.सदर रूट मार्च साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्यातून निघून शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आला.यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस