जळगाव तालुक्यातील राजाराम नगरात राहणारे ८८ वर्षीय वृध्द व्यक्ती हे दुकानावर जावून येतो असे सांगून २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपासून बेपत्ता झाले आहे. याबाबत मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पौलाद नामदेव मेढे वय ८८ रा. राजाराम नगर, ता. जळगाव असे बेपत्ता झालेल्या वृध्दाचे नाव आहे.