सिकंदर खा सालारखा यांनी नेर तहसीलदार यांना निवेदन सादर केले. निवेदनानुसार आठ ऑगस्टला रात्रीपासून निरंतर पाऊस सुरू होता तसेच संपूर्ण परिवार झोपेमध्ये असताना मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास अचानक घराची भिंत कोसळली अशा सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही.बाजूला लोखंडी पलंग असल्याकारणाने कुटुंबीयांचा बचाव झाला.परंतु या नैसर्गिक आपत्तीमुळे परिवार हा उघड्यावर आला आहे तरी संपूर्ण घटनेची शहानिशा करून सिकंदरखा सालारखा यांना शासनाच्या माध्यमातून सहाय्य तथा निवास सहाय्य मिळण्यात यावे या...