उचगाव ते चिंचवाड जाणाऱ्या रोडवर गोवा बनावट दारूच्या मालाची बेकायदेशीर वाहतूक करणारा आरोपी इसाक मुजावर याला अटक करून त्याच्याकडून गोवा बनावटीची 53,475 किमतीची दारू व कंटेनर असा एकूण 10 लाख 53 हजार 475 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.