1 ऑगस्ट रोजी नियोजनभवनात महसूल दिन व महसूल सप्ताहाचा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी जलद व तत्पर सेवा ही महसूल विभागाची कायमस्वरूपी कार्यपद्धती बनवावी, असे स्पष्ट केले. कार्यक्रमाला सीईओ अनिता मेश्राम, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, आयुक्त सुनील लहाने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उत्कृष्ट कार्याबद्दल महसूल कर्मचाऱ्यांचा व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार दुपारी 5 वाजता करण्यात आला. विविध योजनांचे प्रमाणपत्र वितरणही करण्यात आले.