नागपूर रायपूर महामार्गावरील कारधा टी पॉईंट वर पल पल हॉटेल समोर दि. 5 सप्टेंबर रोजी सायं. 6.45 वा. सौरभ किशोर मेश्राम वय 25 रा. भीलेवाडा हा मोटर सायकल क्र. MH 36 AJ 8376 ने कारधा कडून भिलेवाड्याला जात असता पल पल हॉटेल समोर त्याची मोटरसायकल अनियंत्रित होऊन डिवाइडरला आदळली. त्यात सौरभ याच्या चेहऱ्याला व खांद्याला दुखापत झाली.