गणेशोत्सवाचे अनुषंगाने गणेशभक्त कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, व मुंबई येथून मोठ्या प्रमाणावर कोकण व गोवा या भागात जाण्याकरिता खाजगी व प्रवासी वाहनांचा वापर करतात. त्यामुळे या कालावधीत दोन्ही (पुणे व कोकणमार्गे) मार्गावर प्रचंड प्रमाणात बाहतुकीची वर्दळ वाढते. याकरिता गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे.अशा वाहनाच्या वाहतुकीस पूर्णतः बंदी सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे यांनी लागू केली आहे.