गळंकी भागात दि. ६ सप्टेंबर रोजी अल्पवयीन तरुणीवर अमानवी अत्याचार करणाऱ्या नराधमाचे अतिक्रमित घर पाडण्याची मागणी जोर धरत आहे. संबंधित आरोपी गळंकीत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असून समाजाला धोका असल्याने त्याचे घर बुलडोझरने पाडून बेघर करण्याची मागणी दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजता शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. यामुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळून प्रशासनाचा नागरीकांमध्ये दबदबा राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.