रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह नेहमीच मोठा असतो. सात दिवसांचा गौरी गणपतीचा सण अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. आणि मंगळवारी बाप्पांना निरोप देताना प्रत्येक डोळ्यात ओलावा होता. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही साथ घालताना भक्तांचे मन भरून आले होते.