मुर्तीजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथील शेतकरी राजेंद्र ढोरे यांचा सरकारच्या मदतीची वाट पाहून पाहून शेवटी जीव गेला. पण मदत काही मिळाली नाही. अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे आणि वाढलेल्या कर्जाच्या ओझ्यामुळे खचलेल्या या अन्नदात्याचा सरकारच्या खोट्या आश्वासनांनी बळी घेतला.