पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात पोलिसांनी सोमवारी ८ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली आहे. एका राजस्थानी ढाब्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १६४ किलो ६८४ ग्रॅम वजनाचे अफूचे सुकलेले बोंडे जप्त केले आहेत. या कारवाईत अंमली पदार्थांसह एक ट्रक, एक कार आणि रोख रक्कम असा एकूण ५० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी ९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.