करमाळा शहरात गस्तीदरम्यान पोलिसांनी अवैध्य पिस्तूल बाळगणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले. मौलाली माळ येथील अमीन रशीद बेग (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. करमाळा पोलीस ठाण्यात याबाबत पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी २७ रोजी दुपारी ४ च्या सुमारास संवाद साधला. आरोपी अमीन बेगवर यापूर्वीही दरोड्याचा प्रयत्न, एनडीपीएससह मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.