घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले असता घराचा कोयंडा तोडून घरात ठेवलेले जवळपास १०.५ तोळे सोन्याचे दागिनेव १५ हजारांची रोख रक्कम चोरटयांनी चोरून नेल्याची घटना सिद्धार्थनगर येथे घडली. त्याचप्रमाणे येथून जवळ अजमेरा रेसिडेन्सी जवळील गजानन पुरभे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून चोरटयांनी जवळपास २.६ तोळे सोन्याचे दागिने व ३५ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. या दोन्ही घरातील चोरीप्रकरणी नितीन वाघमारे यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.