पूर्णा तालुक्यातील फुकटगाव परिसरात रेल्वेच्या धडकेत एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना चार सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. रामप्रसाद मोरे असे मयत व्यक्तीचे नाव असून फुकटगाव शिवार परिसरात गुरुवारी सकाळच्या सुमारास रेल्वेच्या धडकेत त्यांच्या डोक्याला व पायाला जबर दुखापत होऊन यात त्यांचा मृत्यू झाला.