बीड तालुक्यातील आहेर धानोरा येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आणखी एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष वळे (वय ४०) या शेतकऱ्याने आर्थिक अडचणींना कंटाळून आणि मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याच्या नैराश्यातून २ सप्टेंबर रोजी कीटकनाशक प्राशन केले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचे निधन झाले. संतोष वळे यांच्याकडे कुणबी असल्याचा जुना पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना आरक्षणाचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे आत्महत्या केली.