नुकत्याच झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत पंचधारा प्रकल्पाला क वर्ग पर्यंटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या सेलू तालुक्यातील रिधोरा येथील पंचधारा पर्यंटन स्थळाला आज पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास भेट दिली. निसर्ग सौदर्य असलेल्या या पंचधारा पर्यंटन स्थळावर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मोठ्या प्रमाणावर पर्यंटक येत असल्यामुळे पर्यंटनाच्या चांगल्या सुविधा निर्माण करुन देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.