परतीच्या पावसाने भद्रावती तालुक्यात थैमान घातले असुन तालुक्यातील गुंजाळा गावात लगतच्या नाल्याला पुर आल्याने पुराचे पाणी शिरल्याने गावातील गावकऱ्यांचे दैनंदिन जिवन प्रभावित झाले आहे.अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. नाल्याला पुर आल्यामुळे कचराळा-गुंजाळा मार्ग बंद झाला आहे. तलाठ्याच्या पथकाने गावातील पुरपरीस्थितीची पाहणी करुन पुरस्थितीचा आढावा घेतला आहे.