: पुण्यातील गणेशोत्सव काळात शहराच्या मध्यवर्ती भागात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. भाविकांची ये-जा सुलभ व्हावी व गर्दीवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी महामेट्रोकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर दर तीन मिनिटांआड मेट्रो धावणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. या विशेष सेवेसाठी मागील दोन दिवसांपासून चाचणी सुरू आहे. मंडई व कस