बोरी गावात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत शनिवार 23 ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देशी दारू दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत ७० हजार रुपयांची रोकड लंपास केली. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून यामध्ये चोरटे चोरी करताना दिसत आहे. या प्रकरणी भास्कर प्रभू राठोड यांच्या फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यात आज रविवार 24 ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.