तुमसर तालुक्यातील परसवाडा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची नळ योजना भर पावसाळ्यात बंद असून गावात पिण्याच्या पाणी नाही.सदर नळ योजना चालवायला शासनाकडे पैसे नसल्याने ही नळ योजना बंद होती. अखेर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. 25 ऑगस्ट ला परसवाडा येथील उपसरपंच पवन खवास यांनी भिकाऱ्याचे सोंग घेत तहसील कार्यालय, पं. स. कार्यालय तसेच गावात भिक मागून ते पैसे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकारांच्या टेबलावर दिले. सदर भीक मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.