246 views | Sindhudurg, Maharashtra | Aug 12, 2025
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन च्या वतीने दिनांक 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये अंगदान जीवन संजीवनी आहे हे अभियान अवयवादानाबाबत जनजागृती करिता राबविण्यात येत आहे . माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी सदरचे अभिमान सर्व जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.या अभियानाच्या अंतर्गत अवयदान ची प्रक्रिया, कायदेशीर बाबी अवयव दानबाबत असलेले गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने डॉ. सई धुरी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची विस्तृत मुलाखत उद्या दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी सिंधुदुर्गनगरी आकाशवाणी केंद्राच्या मार्फत प्रसारित होणार आहे.