घनसावंगी तालुक्यातील चित्रवडगाव येथे विविध विकास कामाचे लोकार्पण माजी मंत्री आ. राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यात चित्रवडगांव फाटा ते गाव रोडचे भूमिपूजन व 2022- 23 मध्ये गावांतर्गत माजी सरपंच वर्षा सोसे यांनी केलेल्या विविध कामाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी सभापती गंगाधर सोसे,आबासाहेब वरखडे, बळवंत देशमुख,मधुकर देशमुख,अमोल देशमुख,धनंजय देशमुख,नजीम पठाण, डॉ सय्यदयादी उपस्थित होते.