एक 48 वर्षीय इसम 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सुमारास कुटुंबीयांना शौचास जातो असे सांगून घरून निघून गेला होता. सायंकाळ होऊनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पालांदूर पोलीस ठाणे गाठीत बेपत्ता असल्याची तक्रार दिली मात्र 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घरामागच्या नाल्यात खोल पाण्यात संबंधिताचा मृतदेह आढळल्याची घटना घडली. प्रकाश डोमा शेंडे (48) असे घटनेतील मृतक इसमाचे नाव आहे. ही घटना उघडकीस येताच या घटनेची माहिती पालांदूर पोलिसांना देण्यात आली.