सेनगांव तालुक्यातील वरखेडा या ठिकाणी कर निमित्त नवसाला पावणाऱ्या मारोतीरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली असून भाविकांसाठी 100 लिटर दूध व 30 क्विंटल तांदळाची खिचडी म्हणून महाप्रसाद गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य असा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला असून या यात्रा महोत्सवांमध्ये मराठवाड्या सह विदर्भातील भाविकांनी मोठी उपस्थित दर्शवली. जवळपास 400 ते 500 वर्षाची परंपरा असलेल्या या सणानिमित्त भव्यदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.