चंद्रपूर दौऱ्यावर आलेले पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुधर्शनजी यांच्या उपस्थितीत आज दि 31 आगस्टला 10 वाजता आ. करण देवतळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान सद्यस्थितीतील कायदा-सुव्यवस्था, जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरू असलेली उपक्रमशील पावले तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर संवाद साधण्यात आला.