मनोज जरंगे पाटील गेल्या चार ते पाच दिवसांपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले होते. त्यांना समर्थन देण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक मराठा आंदोलन येत होते, मात्र आझाद मैदानावर गर्दी होत होती,त्यामुळे नवी मुंबईच्या वाशी येथील सिडको एक्जीबिशन सेंटरवर महानगरपालिकेने त्यांच्या खाण्याचे राहण्याची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर आंदोलकांच्या दाढी आणि केस कटिंग ची व्यवस्था देखील महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील एक्जीबिशन सेंटर येथे करण्यात आले होते.