अकोट दिनांक ३०.०९.२०२५ रोजी येथील वि. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी अकोट ग्रामिण पोलीस स्टेशनचे फाईल वरील अप. क्र. १७२/२०२५, कलम १०३ (१), भान्यासं. मधील आरोपी गजानन साहेबराव रेळे, वय ५४ वर्ष राहणार वडाळी सटवाई ता. अकोट जि. अकोला या आरोपीचा पहिलाच जमानत अर्ज नामंजूर केला आहे. वरील आरोपी या प्रकरणात अकोला कारागृहात दि. ०८.०४.२०२५ पासुन बंदीस्त आहे.याने आर्थिक व्यवहारातुन रमन चांडक यांना अज्ञातस्थळी विश्वासघाताने नेवुन ठार करण्यात आले होते.