नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील निवळी शेत शिवारात दि 27 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात ते रात्री साडेनऊचे दरम्यान यातील फिर्यादी यांचे शेत शिवारात बांधलेला एक बैल किमती 60 हजार रुपयाचा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. याप्रकरणी फिर्यादी अच्युतराव पाटील.व्यवसाय शेती.यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मुक्रमाबाद येथे आज रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान जनावर चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून या गुन्ह्याचा पुढील तपाससुरू आहे.