बुलढाणा शहरातील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे सोन्याची पोत (किंमत अंदाजे २५ हजार रुपये अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना २५ ऑगस्ट रोजी घडली आहे.याप्रकरणी रंजना शिवलाल बच्चीरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.