स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पथक दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान उसरागोंदी येथे पेट्रोलिंग करीत असताना आरोपी निखिल चिंतामण मारवाडे वय 30 वर्षे व रोहित दिलीप मारवाडे वय 22 वर्षे दोन्ही रा. खमारी बुटी यांनी त्यांच्या ताब्यातील विना क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टर मध्ये विना पास परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आले. दोन्ही आरोपींच्या ताब्यातून दोन ट्रॅक्टर, दोन ट्रॉली व दोन ब्रास रेती असा एकूण किंमत 12 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.