जागतिक विश्वबंधुत्व दिवसानिमित्त मानवानी मानवाच्या जीवनदानाच्या कामात यावे या हेतूनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खोकरला भंडारा, इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा भंडारा व लायन्स क्लब, रोटरी क्लब च्या संयुक्त विद्यमाने ओम शांती सेंटर खोकरला येथे भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन 24 ऑगस्ट रोजी स. 10- दु. 3 वाजता दरम्यान करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ओम शांती सेंटरच्या संचालिका ब्रम्हाकुमारी शालू दीदी, अतिथी म्हणून ब्रह्माकुमारी शोभा दीदी व अन्य हजर होते.