महागाव सह राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने दौरा करून नुकसानीची पाहणी करत आहे. महागाव तालुक्यात १०० टक्के नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला नुकसानीचे तातळीने पंचनामे करून भरपाईचे आदेश देण्याची मागणी आज दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान महागाव तालुक्यातील उटी येथील नुकसानग्रस्त शेतकरी भवानराव गावंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.