लातूर : साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनीक जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता लातूर महापालिकेसमोर मातंग समाजाच्या वतीने हलगीनाद आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या समोर आंदोलन कर्त्यांनी बसून हलकी नाद केला व प्रवेशद्वारा समोरच झोप काढू आंदोलन हे केल्याचे पाहायला मिळाले यावेळी विविध मागण्याच्या मनपा आयुक्त मानसी यांना निवेदन देण्यात आले.