अमरावती विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. पात्र शिक्षकांनी विहित नमुना-19 मधील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 6 नोव्हेंबरपर्यंत दाखल करावेत. प्रारुप मतदार यादी 25 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल, तर अंतिम यादी 30 डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. सर्व पात्र शिक्षकांनी वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करून मतदा