सिरसाळा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत कार्यालयात काम करणाऱ्या कष्टकरी कर्मचाऱ्यांचे रुपये 28 लक्ष 06 हजार 400 रुपयांचे वेतन गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत आहे. सणासुदीचे दिवस असल्याने थकीत वेतन देण्यात यावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला असून 24 दिवस धरणे आंदोलन करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने अथवा जिल्हा परिषदेने यावर काहीही तोडगा काढला नाही. आज बुधवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला युवा नेते राजेभाऊ फडनी पाठिंबा दिला.