आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान मुक्रमाबाद येथील दुग्ध व्यवसायीक बालाजी खांकरे आणि संतोष खांकरे यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने जवळपास ६० जनावरांचा गुदमरून मृत्यू झालाय. जवळपास दिड कोटीचे नुकसान दोघा भावांनी सांगितले. ४० म्हशी, १५ गिरगाय आणि इतर १५ जनावरे होते.या आस्ममानी संकटामुळे अवघ्या दहा मिनिटात त्यांचं होत्याचं नव्हतं झाल. शासनाने व्यवसाय उभारण्यासाठी मदत करावी, अन्यथा स्वेच्छा मारणासाठी परवानगीद्यावी अशी मागणी खांकरे केलीये.