सेनगांव तालुक्यातील हाताळा या ठिकाणी आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे क्रांती सेना संघटनेच्या शाखेचे अनावरण करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत डोंगरे व सरपंच यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले असून या कार्यक्रमाला अण्णाभाऊ साठे क्रांती सेनाचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव मानमोठे,पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद वैरागड यांच्या सह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.