तुळजापूर–लातूर महामार्गावर वडगाव लाख परिसरात राम अर्जुन कांबळे (वय 52) यांचा अपघातात मृत्यू झाला. मोटारसायकलची चैन तुटल्याने ते मदतीसाठी पायी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहनचालक मदत न करता पसार झाला. याबाबत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.