जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता च्या सुमारास अकोल्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसराची पाहणी करून औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमण, सुरक्षितता व इतर अडचणी तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी ‘अकोलावाला फूड प्रोसेसिंग क्लस्टर’चा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. अन्न तपासणी प्रयोगशाळा, शीत साठवणूक गृह, तसेच एस.एस. इंडस्ट्रीज, लेबन लॅबॉरटरीज यांसारख्या उद्योगांची त्यांनी पाहणी केली. उद्योगांतील चोरी रोखण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त