मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने 'श्रीगणेशा आरोग्याचा' हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केले होते .याअंतर्गत चोहट्टा बाजार येथे छत्रपती शासन गणेश उत्सव मंडळ द्वारा श्रीगणेशा आरोग्याचा" शिबिर पार पडले.त्यासाठी परिसरातील रुग्णांनी प्रचंड प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत सुमारे 50 पेक्षा जास्त रुग्णांची या शिबिर तपासणी केली.