नानेगाव शिवारातील दारणा नदी काठालगत पळसे साखर कारखान्याच्या विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आठ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता मिळाली.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वन नाशिक वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी बचाव पथक,रेस्क्यू नाशिक डिव्हिजन यांनी सर्व आवश्यक साहित्य घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. दोरीच्या साह्याने पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याच्या पिल्लाला सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात आले आहे.