जमिनीच्या सौद्याचे इसारपत्रासाठी बँकेतून पैसे काढून दुचाकीच्या डिकीत ठेवणे एका प्रॉपर्टी डीलरला महागात पडले. अज्ञात चोरट्याने संधी साधून मोपेडच्या डिकीतून 1.50 लाख रुपयांची रोकड लंपास केली. दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता राम शेवाळकर परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालय जवळ ही घटना घडली. फिर्यादी प्रॉपर्टी डीलर बंडु तुकाराम बानकर (55), रा. छोरिया लेआऊट, गणेशपुर यांनी घटनेबाबत पोलिसात तक्रार नोंदविली.