रावेर तालुक्यात सावदा शहर आहे. या शहरात साळीबाग हा परिसर आहे. या परिसरातील रहिवाशी अजय सुधाकर फाटके वय३८ हा तरुण आपल्या घरी सांगून गेला की मी फैजपूर शहरात कापड दुकानावर कामाला जात आहे. मात्र, नंतर तो घरी परतलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र,तो कुठेच मिळून आला नाही म्हणून सावदा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.