लातूर :केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केलेली जीएसटी दरकपात ही सर्वसामान्य जनतेच्या समृद्धीचा महामार्ग ठरणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर व भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्या प्राध्यापक प्रेरणा होनराव यांनी केले. ते लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज सायंकाळी पाच वाजता लातूरच्या कन्हेरी चौकातील त्यांच्या संपर्क कार्यालयात बोलत होते.