मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. या उपोषणातून आज तोडगा निघाला आहे.राज्य सरकारचे शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेऊन जीआर दिला आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि सरकार त्यांना आरक्षण देण्यासाठी सकारात्मक होते आणि यापुढे देखील असेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथ शिंदे यांनी दिली तसेच आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचे आभार देखील मानले.