कदम वस्ती येथील एचपी गेट नंबर एक समोर पुणे सोलापूर महामार्गावर डंपरच्या धडकेत जसराज चौधरी हा तरुण गंभीरित्या जखमी झाला होता. त्याच्यावर लोणी काळभोर येथील एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.