ऑल इंडिया किसान सभेच्या हाकेला प्रतिसाद देऊन तालुक्यातील शेकडो शेतकरी, मजूर, महिला व विद्यार्थी सज्ज होत आहेत. धान वाचवण्यासाठी आणि हक्काचे अन्न परत मिळवण्यासाठी ही लढाई आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे.“शेतकऱ्यांच्या घामाचे अन्नधान्य सडवून शासन जनता व शेतकऱ्यांचा घोर अपमान करत आहे. जनता आता हातावर हात धरून बसणार नाही. धान उचलले गेले नाही तर महामंडळ कार्यालय मध्ये धान फेकून भ्रष्ट महामंडळ चा मुखवटा फाडून टाकला जाईल.” असा इशारा देण्यात आला आहे.