डोंबिवली पश्चिम परिसरातील महात्मा फुले रोडवर असलेल्या आनंदी कला केंद्र नावाच्या कारखान्यामध्ये अनेक गणेश भक्तांनी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून गणेश मूर्तींचे बुकिंग केले होते आणि पैसे देखील दिले होते. मात्र मूर्तिकार पैसे घेऊन अचानक पसार झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. अवघ्या काही तासावर गणरायाच्या आगमन आलेले असताना अचानक हे संकट गणेश भक्तांवर ओढावल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून प्रकरणाचा तपास करत आहेत.