तिघांना चौघांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घटना तिन पुतळे परिसर येथे २७ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत संतोष सुधाकर उमाळे वय ४५ वर्ष यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, प्रेम कैलास इंगळे, योगशे कैलास इंगळे,.वैशाली गणेश गाडेराव व.रिना कैलास इंगळे. रा तिन पुतळे परिसर यांनी वाद घालून मला मारहाण करून जखमी केले तसेच आवरण्यासाठी माझा भाचा आकाश व माझी भाची रूपाली हे मध्ये आले असता त्यांना सुद्धा मारहाण करून जखमी केले.