लातूर - मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या आंदोलनासाठी मराठा बांधव एकवटले असून त्यांचे आंदोलन स्थळी गैरसोय होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्त व निलंगा तालुक्यातील मुगाव येथील मराठा बांधवांच्या वतीने आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान लातूर येथील अशोक हॉटेल जवळून सुयोग ट्रॅव्हल्स ने 2000 बांधवांना पुरेल एवढा भाकरी ठेचा दही धपाटे बिस्कीट, पाणी बॉटल मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे.